महिलांविरोधातील अत्याचारांबाबत जनजागृती करण्यासाठी कॅनडातील राजकारण्यांनी घातले “हाय हिल्स’

टोरांटो – कॅनडाच्या अनेक राजकीय पुरुष नेत्यांनी आज संसदेत वावरताना चक्क उंच टाचांचे बूट घातलेले दिसून आले. त्यांच्या या कृतीचे व्हिडीओ देखील इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. मात्र त्यांच्या या कृतीबद्दलचे कारण खूपच वेगळे होते.
महिलांविरोधातील अत्याचारांबाबत जनजागृती करण्यासाठी आणि महिलांना पाठिंबा दर्शवण्यासाठी कॅनडाच्या संसदेतील अनेक पुरुष नेत्यांनी गुलाबी रंगाचे “हाय हिल्स’ सॅन्डल घालून अभिनव पद्धतीने आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. हॉल्टन वुमन्स प्लेस या संस्थेने “होप इन हायय हिल्स’ या अभियानाचा भाग म्हणून ही कल्पना राबवली होती.
कॅनडामधील मंत्री ओमर अल्गाब्रा यांनी ट्विटरवरून या अभिनव कृतीमागील प्रेरणेची माहिती दिली. आजही आपल्या समाजामध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. या अत्याचारांबाबत जनजागृती करण्याचे काम “होप इन हिल्स’या उपक्रमातून केले जाते आहे.
महिलांच्या बूमिकेत राहून त्यांचा विचार करण्यात यावा, ही त्यामागील मुख्य कल्पना आहे. महिलांवरील अत्याचाराला विरोध करण्याच्या उपाय योजनांमध्ये पुरुष आणि मुलांनी सहभागी व्हावे, यासाटी “जिंक हाय हिल्स’वापरण्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

