कॅनडाकडून त्यांच्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी ; भारतातील ‘या’ राज्यात प्रवास न करण्याचा दिला सल्ला

India-Canada Tensions : आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे. खलिस्तान टायगर फोर्सचा ( केटीएफ ) नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडादरम्यान संबंधांमध्ये तणावर निर्माण झाला आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. अशातच कॅनड सरकारने पुन्हा एकदा भारताला छेडले आहे. कॅनडातील नागरिकांसाठी एक ट्रॅव्हल अॅडव्हायजरी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात भारतातील एका राज्यात कॅनडा नागरिकांनी प्रवास करू नये असा सल्ला दिला आहे.
कॅनडा सरकारने प्रसिद्ध केलेल्या ऍडव्हायजरीत सांगितल्यानुसार, “सुरक्षिततेच्या कारणास्तव जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशाचा प्रवास टाळावा. तिथे दहशतवाद, अशांतता आणि अपहरणाचा धोका आहे. यातून लडाख या केंद्र शासित प्रदेशाला वगळण्यात आलं आहे.” असे म्हटले गेले आहे.
“Avoid all travel to the Union Territory of Jammu and Kashmir due to the unpredictable security situation. There is a threat of terrorism, militancy, civil unrest and kidnapping. This advisory excludes travelling to or within the Union Territory of Ladakh,” says Canada in its… pic.twitter.com/AxV7aZ18q3
— ANI (@ANI) September 19, 2023
खलिस्तान टायगर फोर्सचा नेता हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येमागे भारत सरकारच्या एजंटचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टड्रो यांनी पार्लटमेंटमध्ये केला. मात्र, हे आरोप ‘निर्थक आणि कोणाची तरी फूस लावल्याचे असल्याचे म्हणत भारताने कॅनडाच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले.
दरम्यान, ४५ वर्षीय हरदीप सिंग निज्जर हा प्रतिबंधित केटीएफचा (खलिस्तान टायगर फोर्स) प्रमुख होता आणि भारताकडून सर्वाधिक शोध घेतल्या जाणाऱ्या दहशतवाद्यांपैकीच एक होता. त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस होते. पश्चिम कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतामधील सरे येथील गुरुद्वारात १८ जून रोजी दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता.





