Sanjay Raut : मे महिन्यात विधानपरिषदेच्या नऊ सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. नुकताच या सदस्यांचा निरोप समारंभ पार पडला. या सदस्यांमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. महाविकास आघाडीकडून विधानपरिषदेसाठी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी उबाठा गट आग्रही आहे. तशी इच्छा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे. Sanjay Raut मात्र, राज्यसभेच्या उमेदवार निवडीवेळी आघाडीत जोरदार खंडाजंगी झाली होती. शेवटी ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या नावावर एकमत झाले. त्यामुळे विधान परिषदेसाठी पुन्हा उद्धव ठाकरे यांना संधी मिळणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे. Sanjay Raut Sanjay Raut : 2029 मध्ये उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात? संजय राऊत म्हणाले… या सगळ्या चर्चा सुरू असतानाच संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी एक मोठं विधान केले आहे. 2029 मध्ये उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी “का नाही होऊ शकत? आम्ही सर्वजण त्यांच्यासाठी प्रयत्न करू.” असे मोठं वक्तव्य केले आहे. Sanjay Raut पुढे ते बोलताना म्हणाले, “सध्या पक्षावर मोठं संकट आहे आणि फोडाफोडी तसेच पक्षातील नेत्यांची पळवापळवी सुरू आहे. आम्ही खासदार आहोत का, आमदार आहोत का हे विसरून आधी पक्ष वाचवणं महत्त्वाचं आहे. एक मजबूत संघटना उभी करून पुन्हा जनतेसमोर जाणं आणि सध्याच्या सरकारविरोधात संघर्ष करणं ही आमची प्राथमिकता आहे.” Sanjay Raut या वक्तव्यातून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत सत्ताधारी पक्षालाही अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. हेही वाचा : Pune News : बाणेरमध्ये बेशिस्त पार्किंगचा कहर; पादचाऱ्यांचे हाल, वाहतूक पोलिसांवर प्रश्नचिन्ह