वेदांतिकाराजे भोसले; मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी कमळालाच साथ द्या
सातारा – देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मरणार्थ स्वागत कमान बांधण्याची घोषणा एका स्वयंघोषित नेत्याने केली होती. दोन – अडीच वर्ष झाली तरी साधी एक स्वागत कमान उभी करता आली नाही. तेच आज मतदारसंघात याव करणार, त्याव करणार अशा थापा मारत आहेत. अशा स्वयंघोषित नेत्यांकडून काय विकास होणार, असा परखड सवाल सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी उपस्थित केला. दरम्यान, सातारा शहराचा कायापालट करण्यासाठी दोन्ही राजेंना मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
शहरातील काशीविश्वेश्वर मंदिरासमोर आणि सोमवार पेठेतील अरुण टेलर दुकानासमोर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत त्या बोलत होत्या.
यावेळी सभेस नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक अशोक मोने, निशांत पाटील, सौ. लीना गोरे, श्रीकांत आंबेकर, राजू भोसले, स्मिता घोडके, सुहास राजेशिर्के, सुजाता राजेमहाडिक, यशोधन नारकर, सुवर्णा पाटील, प्रकाश बडेकर, नासिर शेख, राजू गोरे, दत्ताजी थोरात, राम हादगे, विजय काटवटे, हेमांगी जोशी, विजय नाफड, विजय नावंधर, डॉ. अजय साठे, बबलू केंडे, दिगंबर सांडगे, दीपक शिंदे, राजेंद कासट, आकाश आवटे, दादा आवटे, सलीम शेख, गणेश नारकर, सुनील रामाने, ज्ञानेश्वर नलावडे, नागेश रामाणे यांच्यासह सर्व आजी माजी नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या, आज सातारा शहरात ग्रेड सेपरेटर, कास धरण उंची वाढवणे ही कामे प्रगतीपथावर आहेत तर, हद्दवाढ प्रस्ताव मंजूर झाला आहे. शहरातील रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणासाठी 50 कोटी निधी मंजूर झाला आहे. याशिवाय अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवसृष्टी उभारणे, मेडिकल कॉलेज, एमआयडीसीमध्ये नवीन मेगा प्रोजेक्ट आणणे, महाराष्ट्र स्कुटर कंपनीचा प्लांट चालू करणे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
अशी मोठमोठी कामे करायची असतील तर विरोधी बाकावर बसून निधी मिळणार नाही. त्यामुळेच दोन्ही राजेंनी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांना तुमची साथ हवी आहे. सबका साथ सबका विकास या उक्तीप्रमाणे संपूर्ण मतदारसंघाचा आणि जिल्ह्याचा विकास करण्यासाठी भाजपला साथ द्या आणि दोन्ही राजांना विजयी करा, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी केले.