Suraj Chavan : दबक्या पाऊलांनी आली….; गुलीगत सुरज चव्हाणने गुपचूप उरकला साखरपुडा? व्हिडिओ होतोय व्हायरल….

Suraj Chavan : सूरज चव्हाण हा बिग बॅास या रियालिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहचला. या शोमुळे सूरजला मोठी लोकप्रियता मिळाली. यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याला घेऊन झापुक झपूक नावाचा मराठी चित्रपट बनवला. या चित्रपटात सूरज मुख्य भूमिकेत होता. २५ एप्रिल २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर कमाईच्या बाबतीत फारस यश मिळवलं नाही. पण चित्रपटात सूरजने साकारलेल्या पात्राला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. नुकताच सूरज चव्हाणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, त्याने साखरपुडा उरकल्याचे दिसत आहे.
सूरजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक रिल शेअर केली आहे. तो आलिशान गाडीतून सुटाबुटात मुलीच्या घरी एन्ट्री करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सूरजची बहीण देखील त्याच्यासोबत दिसत आहे. दोघेही एका घरात जातात. तिथे त्यांचे आदरातिथ्य केले जाते. यानंतर एक साडी नेसलेली मुलगी पाण्याचे ग्लास घेऊन येते. तिला बघातच सूरज पुरता लालबुंद होतो. सुरजची बहीण त्या मुलीला ओवाळते. आणि त्यानंतर दोघेही एकमेकांना अंगठी घालतात.
View this post on Instagram
मात्र, सूरजचा साखरपुडा झाला नसून ते एक स्वप्न आहे. तो झोपेत स्वप्न पाहत असताना त्याला बहीण झोपेतून उठवते आणि ‘उठ लवकर आता! किती वेळ झोपतोयस, त्या घराचं काम बघ. काय त्या उशीचा मुका घेत बसलायस. त्यावर सूरज म्हणतो, ‘झोपूदे की, कसलं भारी स्वप्न पडलेलं’ हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला सूरजने अखेर आनंदाचा दिवस उजाडला असे कॅप्शन दिले आहे.





