पुणे – लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्यात 11 मतदार संघात मतदान पार पडले जाणार आहे. यात पुणे लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश आहे. मात्र परदेशातून आलेल्या व्यक्तीला मतदान न करताच परतावे लागले. कोथरूडमधील श्रीयश कुलकर्णी या सिंगापूर येथे नोकरीस असून केवळ मतदानासाठी पुण्यात आलेल्या श्रेयसला मतदार यादीत नावच नसल्याने मतदान करता आलेले नाही. मागील सहा वर्षापासून ते सिंगापूर येथे नोकरीस असून त्यांचे कुटूंबिय पुण्यातच आहेत. यावेळी मतदानासाठी ते आवर्जून तीन दिवसांची सुट्टी काढून पुण्यात आले होते. आज ते मतदान करून परत जाणार आहेत. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या वडीलांनी सर्वत्र शोधूनही त्यांचे नाव मतदार यादीत मिळाले नाही त्यामुळे कुटूंबियांची नावे असलेल्या श्रीयश गेले. मात्र, तिथेही त्यांचे नाव न सापडल्याने त्यांना मतदान न करताच माघारी फिरावे लागणार आहे.