Rohit Pawar : महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाला मे महिन्यात चार महिने पूर्ण होत आहेत. अजित पवार यांच्या अकाली जाण्याने अपघात होता की घातपात याबाबत विविध चर्चा सुरूच आहे. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी लावून धरली आहे. या प्रकरणी त्यांनी अनेकदा पत्रकार परिषदा घेऊन अपघाताविषयी मिळलेली माहिती माध्यमांसमोर मांडलेली आहे. (Rohit Pawar ) मात्र, अद्यापही त्यांनी केलेल्या काही मागण्यांची पूर्तता झाली नसल्याने त्यांनी सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. आता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना आव्हान देत अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्यासाठी मित्रपक्षाला भाग पाडावं, असं रोहित पवारांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Rohit Pawar ) रोहित पवारांची सोशल मिडीया पोस्ट “अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास CBI कडं देण्याबाबतचं पत्र आणि नंतर स्मरणपत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींनी त्यांच्या मित्रपक्षाचे नेते तथा मुख्यमंत्री आणि अजितदादांचे ‘मित्र’ फडणवीस साहेबांना दिलं होतं. नंतर अधिवेशनातही हा मुद्दा आम्ही मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक उत्तरही दिलं. पण अजितदादांना जाऊन येत्या २८ तारखेला ४ महिने होतायत, तरी अद्यापही हा तपास CBI कडं दिलेला नाही. त्यामुळं माझं सुनेत्राकाकींना आवाहन आहे म्हणा, आव्हान (Challenge) आहे म्हणा किंवा विनंती आहे म्हणा… की त्यांनी येत्या २८ तारखेपर्यंत हा तपास CBI कडं देण्यास त्यांच्या मित्रपक्षाला भाग पाडावं. यानिमित्ताने त्यांचा मित्रपक्ष हा खरंच मित्र आहे की मित्रपक्षालाच गिळणारा अजगरी वृत्तीचा आणखी कुणी आहे, हे स्पष्ट होईल”. अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास CBI कडं देण्याबाबतचं पत्र आणि नंतर स्मरणपत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींनी त्यांच्या मित्रपक्षाचे नेते तथा मुख्यमंत्री आणि अजितदादांचे ‘मित्र’ फडणवीस साहेबांना दिलं होतं. नंतर अधिवेशनातही हा मुद्दा आम्ही मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर… — Rohit Pawar (@RRPSpeaks) May 14, 2026 “अजितदादा हे चार-दोन महिन्यात लोकं विसरुन जातील, असे नेते नक्कीच नव्हते… सर्वांना न्याय देणारा हा ‘कामाचा माणूस’ होता आणि त्यांना न्याय कधी मिळणार, याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. यासाठी अजितदादांनी निवडून आणलेल्या पण आज ‘विकास’ निधी मिळवण्यासाठी व्यस्त असलेल्या त्यांच्या पक्षाच्या १०० टक्के आमदारांनी वेळात वेळ काढून याबाबत पाठपुरावा करायलाही हरकत नाही. शिवाय आमच्या पातळीवर आम्ही प्रयत्न करतच आहोत, पण सगळ्या यंत्रणा हाती असलेल्या सरकारचीही काही जबाबदारी आहे की नाही? हे सरकार अजून किती दिवस लोकांना वेड्यात काढणार? एक दिवस उत्तर द्यावंच लागेल अन्यथा लोकंच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत” असे काही सवाल उपस्थित करत रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. हेही वाचा : Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा? मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण; महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार?