राज्यसभेच्या एका जागेसाठी 11 सप्टेंबरला होणार पोटनिवडणूक

नवी दिल्ली – समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंह यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेवर 11 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. शुक्रवारी निवडणूक आयोगाने याची घोषणा केली. अमरसिंह यांचे किडनीच्या आजारामुळे सिंगापूरमधील रूग्णालयात 1 आॅगस्ट रोजी निधन झाले होते.

उत्तर प्रदेशमधील राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा कार्यकाळ जुलै 2022 पर्यंत होता. आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, पोटनिवडणुकीची अधिसूचना 25 ऑगस्ट रोजी जारी केली जाईल आणि 11 सप्टेंबर रोजी मतदान होईल. प्रस्थापित पद्धतीनुसार 11 सप्टेंबरला मतदान झाल्यानंतर संध्याकाळीच मतमोजणी केली जाईल.

नुकतीच यूपीच्या राज्यसभा पोटनिवडणुकीत भाजपचे जयप्रकाश निषाद यांची बिनविरोध निवड झाली. निशाद यांनी 13 ऑगस्ट रोजी विधानभवनात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, सपा नेते बेनीप्रसाद वर्मा यांच्या निधनानंतर राज्यसभा जागा रिक्त झाली आणि भाजपाने जय प्रकाश निषाद यांना उमेदवार म्हणून घोषित केले होते .

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.