FIFA World Cup | फिफाला मिळाला बायजुचा आधार
Updated On:

मुंबई – कतारमध्ये यंदा आयोजित होणाऱ्या फीफा फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेच्या मुख्य प्रायोजकत्वाचे हक्क भारतात शिक्षण क्षेत्रात नावारुपाला आलेल्या यूनिकॉर्न बायजू या कंपनीने मिळवले आहेत.
फिफाशी झालेल्या करारामुळे बायजू आता फीफा विश्वकरंडक लोगोचा वापर करत जगभरातील फुटबॉल प्रचारासाठी करु शकणार आहे. तसेच या करारातंर्गत बायजूला शिक्षणाशी संबंधित सर्व प्रसिद्धी मजकूरही लोकांपर्यंत पोहोचवता येणार आहे. ही स्पर्धा येत्या 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान होणार आहे.




