2 डिस्पे असलेला 70 हजारांचा मोबाईल 19,999 रूपयांत, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली – फ्लिपकार्टवर 16 ऑक्टोंबर पासून बिग बिलियन डेज सेल सुरू होत आहे. यात ग्राहकांना अनेक ऑफर्स मिळणार आहेत. या सेलमध्ये दोन डिस्पे असलेला LG G8x ThinQ हा मोबाईल ग्राहकांना फक्त 19,999 रूपयांत मिळणार आहे.

मोबाईलची वैशिष्ट्ये

या LG G8x ThinQ मोबाईल मध्ये 6.4 इंचाचे दोन ओलेड फुल व्हिजन डिस्प्ले दिले आहेत. रिझाॅल्यूशन 2340*1080 आहे. तसेच यात क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर दिला आहे.

6 GB पर्यंत स्टोरेज दिला आहे. तसेच रियर पॅनलवर 12 मेगापिक्सल स्टॅंडर्ड व 13 मेगापिक्सलचा सुपर वाईड लेन्स ड्यूल कॅमेरा दिला आहे. त्याचबरोबर 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

डेडिकेटेड गुगल असिस्टंड बटनासह इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. तसेच या मोबाईलमध्ये 4000 Mah बॅटरी देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.