Sharad Pawar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर आणि त्यांच्या वडिलांवर टीका करताना टीकेची परिसीमा ओलांडली. पडळकरांनी टीका करताना अत्यंत खालचे शब्द वापरले होते. यानंतर त्यांच्या विधानावरून विरोधकांकडून तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला होता. नुकतचं या प्रकरणी सांगली जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोर्चा काढण्यात आला. यानंतर सांगलीत संस्कृती बचाव सभा पार पडली. या सभेतून पक्षातील नेत्यांनी पडळकरांवर सडकून टीका केली. ज्यावेळी माध्यमांत पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या शब्दांत टीका केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांनी फोन केला होता. त्यानंतर फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांना फोनवरून त्यांनी अशी टीका करणे योग्य नसल्याचं म्हटलं होतं. आता यावर शरद पवारांनी भाष्य करत याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना अपेक्षा करूया चांगलं वातावरण होईल असं म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले शरद पवार? आज पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे. माझं कर्तव्य होतं मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं. मुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्तर दिलं, पण फार गांभीर्याने या प्रकरणाकडे पाहिलं नाही, अशी शंका येईल, असं त्यांचं उत्तर होतं, असं शरद पवार म्हणाले. अपेक्षा करूया, राज्यात चांगलं वातावरण होईल, मी त्यावरती समाधानी नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. राज्य सरकारकडे मागणी राज्यात यंदा अभूतपूर्व पाऊस पडला आहे. जे जिल्हे दुष्काळासाठी प्रसिद्ध आहेत त्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीचा परिणाम शेतकऱ्यांच्या संसारावर झाला आहे. सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर होतं. याशिवाय इतर पिकंसुद्धा मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. पण त्यात सोयाबीनचे पीक भरवशाचे पिक असते. पिकं कुजून गेली आहेत तर सोयाबीन उद्ध्वस्त झालं. शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं असून सरकारने त्यांना मदत करावी, अशी मागणी शरद पवार यांनी सरकारला केली आहे. हेही वाचा : माणुसकी जागी ठेवणं नक्कीच आपल्या हातात; सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी महत्वाचा संदेश म्हणाल्या…