Amrita Subhash : मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडलेली अभिनेत्री अमृता सुभाष (Amrita Subhash) आता वेबविश्वातही आपलं नाव मोठं करताना दिसत आहे. तिने आतापर्यंत अनेक वेबसिरीजमध्ये महत्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. आगामी काळातही ती वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहे. अनेकदा अमृता तिच्या चित्रपटातील अभिनयासाठी चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे. एका पॅाडकास्टमध्ये अमृताने बोल्डसीन करता येणार दडपण आणि मानसिक तयारी याविषयी आपलं मत व्यक्त केलं. लस्ट स्टोरीज या वेबसिरीजमधील एका बोल्ड सीनविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने अभिनेत्रींना तू रडण्याचा सीन कसा केला हे विचारलं जात नाही, पण बोल्ड सीनविषयी मात्र विचारलं जातं, असं वक्तव्य केलं. नेमकं काय म्हणाली अमृता सुभाष? (Amrita Subhash) “एकतर तो सीन कोंकणासेन सारखी दिग्दर्शिका शूट करणार आहे आणि श्रीकांत यादव माझा जुना मित्र माझ्यासोबत असणार आहे, या दोन्ही गोष्टींची मला चांगलीच जाणीव होती. त्यामुळे मी बिंदास्त आणि आश्वस्त होते, म्हणून त्या सीननंतर मला एकानेही ट्रोल केलं नाही. कारण तो सीन खूपच वेगळ्या दृष्टीने शूट केला होता. मला वाटतं तो सीन तुम्ही कुठल्या दृष्टीने घेताय हे महत्वाचं आहे.” असे ती म्हणाली. Amrita Subhash : …पण बोल्ड सीनविषयी मात्र विचारलं जातं; अमृता सुभाषचं वक्तव्य चर्चेत पुढे अमृता म्हणाली, श्रृगांर ही एक भावना आहे ती तुम्ही किती खऱ्यापणाने दाखवता हे महत्वाचं आहे. अभिनेत्रींना तू रडण्याचा सीन कसा केला हे विचारलं जात नाही, पण बोल्ड सीनविषयी मात्र विचारलं जातं, असं ती म्हणाली. अमृता सुभाष ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. अमृताची केवळ अभिनेत्री एवढीच ओळख नसून ती गायिका आणि रंगभूमी कलाकार आहे. लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनही तिची ओळख आहे. तिने आपल्या दमदार अभिनयामुळे नाटक, चित्रपट आणि वेब सिरीज या तिन्ही माध्यमांत वेगळी ओळख निर्माण केली आहे. हेही वाचा : US-Iran Tension: “इराणने तडजोड करावी किंवा विनाशाला सामोरं जावं” ; ट्रम्पचा इराणला सर्वात मोठा इशारा