मुंबई : सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येत नाही. लाडक्या बहीणींना तुम्हाला नीट पैसे देता येत नाही, पण मला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन करा, मी 500 कोटी 24 तासांमध्ये घेऊन येतो हे राज्याचे अर्थमंत्री सांगत आहे, असे म्हणत ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला. राऊत म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हे राष्ट्रीय नेते आहेत आणि अजून गावातूनच फिरत आहे. हे या राज्याचे दुर्दैव आहेकी असे नेते या राज्याला मिळाले, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 500 कोटी हा काही लहान आकडा नाही, तुम्ही कुणाच्या तिजोरीतील पैसे लुटणार आहात? असा सवाल त्यांनी केली. अजित पवारांकडे राज्यातील इतर कोणत्याही कामाला द्यायला पैसे नाही. ठणठण गोपाळा, पण माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा जर मी चेअरमन झालो तर 24 तासांमध्ये 500 कोटी रुपये सरकारकडून घेऊन येईल, असे अजित पवार म्हणाले आहेत, असे म्हणत त्यांनी महायुतीवर टीकास्त्र डागले आहे.