मुंबई – बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या एका व्यावसायिकाला सीजीएसटी मुंबई विभागाच्या भिवंडी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. अद्वैत, ई-वे बिल पोर्टल इत्यादी विविध डेटा ऍनालिटिक्स टूल्सचा वापर करून मुंबई सीजीएसटी विभागाच्या भिवंडी सीजीएसटी कर चुकवेगिरी प्रतिबंधक विभागाने हे उघडकीस आणले.
तपासादरम्यान आढळून आले की, व्यावसायिकाने त्याच्या नावे दोन कंपन्या उघडल्या, ज्याद्वारे त्याने एकूण 20.44 कोटी रुपयांच्या आयटीसीचा लाभ घेतला आणि त्याचा वापर केला. आतापर्यंत केलेल्या प्राथमिक तपासात एकूण 32.5 कोटी रुपयांच्या मालाची वाहतूक न करता बनावट आयटीसी वापरून 5.74 कोटी रुपयांचा जीएसटी चुकवल्याचे उघड झाले आहे.
गेल्या सहा महिन्यांत भिवंडी आयुक्तालयाने केलेली ही सातवी अटक आहे. येत्या काही महिन्यांत विभाग बनावट आयटीसी जाळे आणि जीएसटी चुकवणाऱ्या इतरांविरोधात मोहीम अधिक तीव्र करेल.