वाघोली – येथिल श्री शिवछत्रपती प्रतिष्ठाणच्या मागणीला यश आले असून पुणे-नगर रोडवर अत्याधुनिक बस शेल्टर उभारण्यात आले आहेत. याबाबत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कल्पेश जाचक यांनी माहिती दिली आहे. वाघोली गावात पुणे-नगर रोडवर काही ठिकाणी बस थांबे नसल्यामुळे ग्रामस्थ, प्रवाशी यांची ऊन, वारा, पावसामुळे गैरसोय होत होती. यासंदर्भात येथील श्री शिवप्रतिष्ठाणने थांबे उभारण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग हायब्रीड अॅम्युनिटी प्रकल्प कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली होती. प्रतिष्ठाणच्या मागणीला यश आले असून पाच थांबे उभारण्यात आले आहेत.