सोमाटणे – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात डॉ. केतन खुर्जेकर यांच्यासह दोघांच्या मृत्यू झाला. या प्रकरणी शिरगाव पोलिसांनी आराम बस (लक्झरी) चालकास अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यांची सुटका केली. अब्दुल कादर फकीर अहमद (वय 57, रा. धारागिरी गल्ली, बसव कल्याण, जि. बिदर, कर्नाटक) असे लक्झरी चालकाचे नाव आहे.
सोमाटणे गावाच्या हद्दीत सोमवारी (दि. 15) लक्झरी बसने रस्त्यालगत उभ्या असलेल्या मोटारीस पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात संचेती हॉस्पिटलमधील स्पाइन सर्जन डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर (वय 44) व मोटार चालक ज्ञानेश्वर विलास भोसले (वय 24) यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातानंतर चालक फरार झाला होता.
फरार आरोपीच्या शोधात शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. सी. गावित, सहायक पोलीस उपनिरीक्षक उत्तम कांबळे, महादेव कवडे यांच्या पथकाने शोध घेत मुकई चौक येथून ताब्यात घेतले.