कसोटी क्रमवारीत बुमराहची घसरण
Updated On:

दुबई –आयसीसीने बुधवारी ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. त्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची एका स्थानाने घसरण झाली आहे. बुमराह आठव्या स्थानावरून नवव्या स्थानावर ढकलला गोला आहे.
इंग्लंड व पाकिस्तान यांच्यातील दुसरी कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिली होती. त्यानंतर आयसीसीने ही क्रमवारी जाहीर केली. त्या फलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानच्या बाबर आझमने पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला एका स्थानाने पिछाडीवर टाकले. आझम क्रिकेटच्या तीनही प्रकारात पहिल्या पाच फलंदाजांमध्ये आहे.





