Pimpri : ९६ घरांवर बुलडोजर
Updated On:

पिंपरी : शहरातील वाकड येथील ४५ मीटर रस्त्याच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या काळाखडक झोपडपट्टीतील सुमारे ४६ हजार चौरस फूट क्षेत्रफळावरील ९६ झोपड्यांवर पिंपरी चिंचवड महापालिकेने बुधवारी (दि. १६) निष्कासनाची कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये काळाखडक झोपडपट्टीतील २५० मीटर लांबीच्या व १६ मीटर रुंदीच्या क्षेत्रावर असणाऱ्या ९६ झोपड्या निष्कासित करण्यात आल्या.
‘ड’ व ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन, स्थापत्य, शहरी दळणवळण (बी.आर.टी.एस.), नगररचना, विद्युत व अतिक्रमण विभाग यांनी १ पोकलेन्ड, ७ जेसीबी, ४ डंपर व १५ मजुर यांच्या सहाय्याने ही कारवाई केली आहे. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.





