Buldhana Bus Accident : मन हेलावून टाकणारी घटना! बुलढाणा बसअपघाताची भीषणता दाखवणारे फोटो पहा…

बुलढाणा : बुलढाण्यात एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यामधील आठ प्रवाशी सुखरुप बचावले आहेत. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी ही भीषण घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेचे भीषणता दाखवणारे काही फोटो समोर आले आहेत.
विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. ३० जूनला नागपूरहून संध्याकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती.
१ जुलै च्या रात्री १.२२ मिनिटांनी धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली.
त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवासी बस पेटली आणि हा अपघात झाला.
या अपघातानंतर काही प्रवाशांनी काचा फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला.
काचा फोडून बाहेर आलेल्या प्रवाशांचा जीव वाचला आहे. बस अपघातग्रस्त झाल्यानंतर बसमधील काही तरुणांनी काचा फोडल्या आणि ते बाहेर आले. त्यांनी काही प्रवाशांना बाहेर काढले.

हा अपघात १.२६ मिनिटांनी अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.











