पिंपरी – आजच्या सोशल मीडियाच्या युगात इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबमध्ये मुले गुंतत चालली आहेत. यातून त्यांचे लक्ष विचलित व्हावे, गडकिल्ले बांधणी स्पर्धेच्या माध्यमातून स्वराज्याचा आणि आपल्या राजांचा दैदिप्यमान इतिहास त्यांना समजावा व शिवरायांच्या विचारांनी प्रभावित होऊन आजच्या पिढीतील आधुनिक शिवबा घडावा, अशी अपेक्षा माजी नगरसेवक गटनेते राहुल कलाटे यांनी व्यक्त केली. राहुल कलाटे आयोजित दीपोत्सव विशेष गडकिल्ले बांधणी स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. त्या वेळी ते बोलत हेते. या वेळी पलाश सोसायटीचे अध्यक्ष किरण वडगामा, श्री गुरुदत्त व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल कलाटे, शिवशक्ती को-ऑप बॅंकेचे अध्यक्ष विजय कलाटे, फिटनेस आयकॉन प्रशांत विनोदे, हाउसिंग फेडरेशनचे दत्तात्रय देशमुख, सुधीर देशमुख, उद्योजक जितेंद्र वाडघरे, उत्तम वाकडकर, धनंजय कलाटे, सोमनाथ कलाटे, सागर कलाटे, प्रशांत वाघमारे, राहुल भुजबळ, बाळकृष्ण कलाटे, अविनाश कलाटे, चेतन कलाटे, गिरीश शेडगे, तेजस माझिरे उपस्थित होते. स्पर्धेतील विजेते : सोसायटी व मंडळ : प्रथम – जगदंब मित्र मंडळ थेरगाव, द्वितीय-महेश साळवे मित्र परिवार, तृतीय-अलायन्स निसर्ग सोसायटी, उत्तेजनार्थ : अष्टविनायक मित्र मंडळ, स्कायलाइन, जयवंत अपार्टमेंट, वेदांग शिंदे-समर्थ शिंदे वेणूनगर, नृसिंह तरुण मंडळ. वैयक्तिक गट : प्रथम- प्रज्ञा भोकरे, वाकड, द्वितीय-अथर्व जरे, देहूरोड, तृतीय- ऋषिकेश दर्शिले. उत्तेजनार्थ : हर्षदा परीहार, करण बाबर, प्रशांत गराडे, अभिराज देशमाने, वेदांत सूर्यवंशी, संभाजी शेंडकर, उदय तोरणे, श्लोक कोते.