Budget 2026 Speech: अर्थमंत्री निर्मला सीतारमन संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांनी आज आर्थिक बाबतीत मोठी घोषणा करत देशात येत्या १ एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार असल्याचे म्हटले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कराविषयी घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये छोट्या करचोरी प्रकरणात आता कोणतीही शिक्षा होणार नसल्याचे स्पष्ट शब्दात सांगताना निर्मला सीतारामण दिसल्या आहेत. तसेच उद्योगांना प्रोत्साहित करण्यासाठी 10 हजार कोटींचा फंड मिळणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. Budget 2026 Speech: भारतात डेटा सेंटर सुरू करणाऱ्यांना मोठी सूट दिली जाणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली. अघोषित संपत्तीची मर्यादा आता 1 कोटीपर्यंत करण्यात आली आहे. तशी माहिती निर्मला सीतारामण यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. Budget 2026 Speech: त्यासोबतच कर भरण्याची मुदत वाढवून आता ३१ ऑगस्टपर्यंत ही वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता कर भरणे आणखी सुटसुटीत होणार आहे.