Budget 2024 । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत मोदी सरकार 3.0 चा अर्थसंकल्प सादर करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी सादर केलेला हा सातवा अर्थसंकल्प आहे. यापूर्वी, हे निवडणुकीचे वर्ष असल्याने, 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कोणतेही महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदल दिसून आले नाहीत. मध्यमवर्गीयांसाठी विशेष घोषणांचा समावेश सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही. मात्र, आता पूर्ण बजेटमध्ये सरकार करदाते आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन सरकारांव्यतिरिक्त, यावेळी एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये जनता दल युनायटेड आणि तेलुगु देसम पार्टीचाही सहभाग आहे, कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेत भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळवण्यात अपयश आले होते. निवडणुका अशात अर्थमंत्र्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही मोठ्या पक्षांच्या मागण्या लक्षात ठेवाव्या लागतील, असे बोलले जात आहे. अशात आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात भारताच्या आर्थिक धोरणात मोठे बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. केंद्र सरकारने 2024 च्या अर्थसंकल्पात बिहारला मोठी भेट दिली आहे. मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहारमध्ये नवीन विमानतळ, वैद्यकीय सुविधा आणि क्रीडा पायाभूत सुविधांची घोषणा केली. याशिवाय राज्यातील महामार्गांसाठी आणखी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.आंध्र प्रदेशला सुमारे 15 हजार कोटी रुपयांचे पॅकेज मिळणार आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी बिहारला आर्थिक मदत जाहीर केली. बिहारच्या गयामध्ये आम्ही औद्योगिक विकासाला चालना देऊ, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे पूर्व विभागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. रस्ते जोडणी प्रकल्पांच्या विकासातही आम्ही सहकार्य करू. पाटणा-पूर्णिया द्रुतगती मार्ग, बक्सर-भागलपूर महामार्ग, बोधगया-राजगीर-वैशाली-दरभंगा आणि बक्सरमध्ये गंगा नदीवर अतिरिक्त द्विपदरी पूल 26,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे.