Budget 2024 । अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मोदी सरकार 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात आंध्र प्रदेश आणि बिहारसाठी राखीव जागा खुल्या करण्यात आल्या आहेत. रोजगार-कौशल्य विकासासाठी 2 लाख कोटी रुपयांच्या 5 योजना जाहीर केल्या आहेत. त्यासोबतच त्यांनी या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना देशातील गरीब, तरुण आणि महिलांवर केंद्रित असणारा मोदी सरकारचा यंदाचा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले. तरुणांसाठी 5 नवीन योजनांची घोषणा Budget 2024 । अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, 2 लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय खर्चासह 5 वर्षांतील 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्ये आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी 5 योजना आणि उपक्रमांचे पंतप्रधान पॅकेज जाहीर करताना मला आनंद होत आहे. यावर्षी आम्ही शिक्षण, रोजगार आणि कौशल्यांसाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.तसेच त्यांनी आणखी काही मोठ्या घोषणा केल्या . निर्मला सीतारामन यांनी केल्या मोठ्या घोषणा Budget 2024 । * मोफत रेशनची व्यवस्था ५ वर्षे सुरू राहील. * यावर्षी कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद. * रोजगारासाठी सरकार 3 मोठ्या योजनांवर काम करणार आहे. * बिहारमध्ये 3 एक्सप्रेसवेची घोषणा. * बोधगया-वैशाली द्रुतगती मार्ग बांधला जाईल. * पाटणा-पूर्णिया एक्स्प्रेस वेचे बांधकाम. * बक्सरमध्ये गंगा नदीवर दुपदरी पूल. * बिहारमध्ये एक्सप्रेस वेसाठी 26 हजार कोटींची तरतूद. * विद्यार्थ्यांना 7.5 लाख रुपयांचे स्किल मॉडेल कर्ज. * प्रथमच कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पीएफ * नोकऱ्यांमध्ये महिलांना प्राधान्य