अभिनेत्री श्रेया चौधरीने आपली “बकेट लिस्ट’ चाहत्यांशी शेअर केली आहे. ही बकेट लिस्ट शेअर करत श्रेयाने खुलासा केला की, स्वतःला प्रेरणा राहण्यासाठी विविध गोष्टींविषयी केलेले हे सर्व प्रयत्न आहेत.
श्रेया म्हणाली, मला लहानपणापासूनच ऍडव्हेंचरची आवड आहे. मला असा विश्वास आहे की, ऐहिक मार्गापासून वेगळा मार्ग स्वीकारल्यास लोकांना प्रेरणा मिळते. माझ्यासाठी “बकेट लिस्ट’ तीच आहे, ज्यातून मला प्रेरणा आणि आनंद मिळेल.
श्रेया म्हणाली, माझी बकेट लिस्ट खूप मोठी आहे, त्यात स्काय डायव्हिंग आणि पायलटचा परवाना मिळविणे यासह खूप काही आहे. कारण मला आकाशात उंच उडणे खूप आवडले, असे तिने सांगितले.
मला स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस घ्यायचे आहे. तसेच मला विनाकाठी घोडास्वारी करायची आहे. मला वाटते की अधिक ज्ञान मिळविण्यासाठी आणि आश्चर्यकारक आठवणींसाठी हे एक साधन आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर श्रेया चौधरीची ही “बकेट लिस्ट’ खूपच व्हायरल झाली आहे. यावर श्रेयाच्या चाहत्यांनी असंख्य कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.