दगडाने ठेचून अज्ञाताचा निर्घृण खून !
Updated On:

वाघोली : वाघोली येथील चोखीढाणी रोडवरील पोदार स्कुल जवळ अंदाजे ३५ वर्षीय एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना रविवारी (दि.१९ जुलै) उघडकीस आली आहे. या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही. लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविला आहे.
रंग सावळा, उंची व अंगाने मध्यम, गळ्याभोवती फिकट निळ्या रंगाचा रुमाल, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व राखाडी पॅन्ट आहे. त्याच्या उजव्या हातावर कविता तर डाव्या हातावर प्रिया नाव गोंदले आहे. अशा वर्णनाच्या व्यक्तीची माहिती असल्यास लोणीकंद पोलीस स्टेशन 9527069100 वर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.





