भाऊ कदम होणार ‘सिरियल किलर’? नव्या नाटकाद्वारे धमाल करण्यास होणार सज्ज

Bhau Kadam | अभिनेता भाऊ कदम त्याच्या विनोदी शैलीमुळे लोकप्रिय आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या शोद्वारे त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. याशिवाय त्याने मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. परंतु आता भाऊ कदम ‘सिरियल किलर’ झाला आहे. केदार देसाई लिखित दिग्दर्शित ‘सिरियल किलर’ या नाटकातून पुन्हा एकदा भाऊ कदम धमाल करण्यास सज्ज होणार आहे. येत्या शनिवारी 12 ऑक्टोबरला त्याचे नाटक रंगभूमीवर येणार आहे.
अद्वैत थिएटर्स आणि सिंधु संकल्प एन्टरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत, राहूल भंडारे आणि प्रणय तेली निर्मित ‘सिरियल किलर’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात भाऊ कदमसह अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, श्रद्धा हांडे, तेजस पिंगुळकर या नाटकात दिसणार आहे.
View this post on Instagram
मालिका अभिनेत्री आणि रिपोर्टर यांच्यामध्ये घडलेल्या घटनेने संशयाचे सुरुंग पेरले जातात. या घटनेनंतर ‘सिरियल किलर’ म्हणून आलेला खरंच ‘सिरियल किलर’ असतो की नसतो? याचा धमाल खेळ दाखवण्यात आला आहे. बेभान कॉमेडी आणि निखळ आनंदासोबतच आमच्या सगळ्यांच्या भन्नाट ट्यूनिंगची ट्रीट देणारं ‘सिरियल किलर’ हे नाटक प्रेक्षकांना निखळ आनंद देईल’ असा विश्वास अभिनेते भाऊ कदम यांनी व्यक्त केला आहे.
या नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे आहे,तर संगीत विजय गवंडे यांचे आहे. प्रकाशयोजना श्याम चव्हाण यांची असून सूत्रधार सुनील पानकर गोट्या सावंत आहेत. दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ या शोनंतर भाऊ कदमला एका नव्या रूपात पाहण्यासाठी चाहते देखील आतुर झाले आहेत.
हेही वाचा:
‘वय वाढण्याऐवजी कमी होतयं’; सुनील शेट्टीचा लुक पाहून सगळेचं झाले चकित





