Pimpri : बुद्धिबळ स्पर्धेत खेळाडूंची चमकदार कामगिरी

पिंपरी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत बाल खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली. पिंपरीत १९ व २० जुलै रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत ७ व ९ वर्षाखालील अनेक प्रतिभावान खेळाडूंनी सहभाग घेतला. दुसरीकडे, जिल्हास्तरीय स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कॅरम स्पर्धा, वृक्षारोपण आणि रोजगार मेळाव्यासारखे उपक्रमही यशस्वीरीत्या पार पडले.
बुद्धिबळ स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे:
९ वर्षाखालील खुला गट: प्रथम: विहान शहा (७ गुण), द्वितीय: केविन दीक्षित (६ गुण), तृतीय: विहान निगम (५.५ गुण) यांनी चमकदार कामगिरी केली. तसेच ९ वर्षाखालील मुलींमध्ये शौर्या शिंदे, आराध्या गरुड, दुर्वा निकम यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतिय क्रमांक पटकावले. तसेच ७ वर्षाखालील खुला गटामध्ये प्रथम: अनिरुद्ध नगरकर (५.५ गुण), द्वितीय: श्लोक अहुजा (५ गुण), तृतीय: अन्वीत बोरगावे (५ गुण) यांनी बक्षिस मिळविले. याशिवाय ७ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये ऋणवी रणदिवे, पाखी पटेल, तनिष्का जैन यांनी बक्षिसे पटकावली.
या सर्व गटातील विजेत्यांना एकूण ८० हजार रुपयांची बक्षिसे व ४३ सन्मानचिन्हे आणि ९९ पदके देऊन गौरवण्यात आले.
बक्षीस वितरण माजी महापौर योगेश बहल, संजय वाबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी विवेक भागवत यांनी प्रास्ताविक केले, आभार मनीषा भागवत यांनी मानले. सूत्रसंचालन वर्षा जगताप यांनी केले. विकास देशपांडे, हरप्रीतसिंग, गिरीश वाघमारे, धनाजी तांबे, प्रल्हाद जाधव, अरविंद भुसारे यांनी संयोजन पाहिले. स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून शशिकांत मक्तेदार यांनी भूमिका पार पाडली.
अन्य उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
१३ जुलै रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. १९ व २० जुलै रोजी जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याशिवाय, २० जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला. शेकडो बेरोजगार युवकांनी यात सहभाग घेत रोजगाराच्या संधी प्राप्त केल्या.





