ब्रिजभूषण यांच्या अडचणी वाढणार? आरोपपत्र सादर.. पुराव्यांमध्ये फोटोसह व्हिडीओंचा समावेश

Updated On:
ब्रिजभूषण यांच्या अडचणी वाढणार? आरोपपत्र सादर.. पुराव्यांमध्ये फोटोसह व्हिडीओंचा समावेश

नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रामध्ये महिला कुस्तीपटूंवर केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींमधील किमान चार प्रकरणांमध्ये फोटोंचे पुरावे आणि तीन प्रकरणांमध्ये व्हिडीओ पुरावे देण्यात आले आहेत.

गुरुवारी (15 जून) रोजी दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात 1500 पानांचे आरोपपत्र कोर्टात दाखल केले होते. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणच्या तक्रारीप्रकरणी 22 जून रोजी न्यायालयात सुनावणी देखील होणार आहे. तसेच, पॉक्‍सो कायद्याअंतर्गत दाखल असलेले वेगळे आरोपपत्र रद्द करण्यात आले आहे. कारण, अल्पवयीन महिला कुस्तीपटूने ब्रिजभूषण यांच्याविरोधातील तक्रार न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.

वेगवेगळ्या कार्यक्रमांचे फोटो सादर
आरोपपत्रात प्रत्येक तक्रारीचा स्वतंत्र उल्लेख करण्यात आला आहे. सहा महिला कुस्तीपटूंनी आपल्या तक्रारींमध्ये अनेक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. तसेच प्रत्येक आरोपासाठी साक्षीदार, फोटो किंवा व्हिडीओ असल्याचा दावा देखील कुस्तीपटूंनी केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पुरावे म्हणून सादर करण्यात आलेले हे फोटो पारितोषिक वितरण समारंभ, ग्रुप फोटो आणि इतर कार्यक्रमांमधले आहेत. तसेच पोलिसांनी या आरोपपत्रात 200 पेक्षा अधिक लोकांचे जबाब नोंदविले आहेत. ज्यामध्ये प्रत्यक्षदर्शी रेफ्री आणि स्पर्धेतील इतर कर्मचारी यांच्या जबाबांचा समावेश करण्यात आला आहे.

आणखी संबंधित बातम्या

'तोपर्यंत रामलल्लाचे दर्शन घेऊ देणार नाही...' ; ब्रिजभूषण शरण सिंह यांचा राज ठाकरेंना थेट इशारा

2025-03-30 11:46:38

'तोपर्यंत रामलल्लाचे दर्शन घेऊ देणार नाही...' ; ब्रिजभूषण शरण सिंह यांचा राज ठाकरेंना थेट इशारा

ब्रिजभूषण शरण सिंह यांची भाजपमधून होणार हकालपट्टी ? ; मुलाचे तिकीटही परत केले जाणार?

2024-05-11 10:17:51

ब्रिजभूषण शरण सिंह यांची भाजपमधून होणार हकालपट्टी ? ; मुलाचे तिकीटही परत केले जाणार?

ब्रिजभूषण शरण सिंह लढण्याआधीच चितपट; कैसरगंज मतदारसंघातून मुलगा करण भूषणला उमेदवारी

2024-05-02 18:16:21

ब्रिजभूषण शरण सिंह लढण्याआधीच चितपट; कैसरगंज मतदारसंघातून मुलगा करण भूषणला उमेदवारी

Lok Sabha Election 2024 : "मला कैसरगंजमधूनच उमेदवारीचा पाहिजे....'; ब्रिजभूषण सिंह यांचा हट्ट !

2024-04-09 16:03:42

Lok Sabha Election 2024 : "मला कैसरगंजमधूनच उमेदवारीचा पाहिजे....'; ब्रिजभूषण सिंह यांचा हट्ट !

ब्रिजभूषण यांच्यासह संजय सिंहना जीवे मारण्याची धमकी ! अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

2024-01-14 17:59:42

ब्रिजभूषण यांच्यासह संजय सिंहना जीवे मारण्याची धमकी ! अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल