BREAKING ! केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलाच तापू लागलं आहे. उद्धव ठाकरेंनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे संकेत यापूर्वीही दिले होते. त्यानुसार आता ठाकरे गटाने निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
या निर्णयाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार हे निश्चित होत. निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्याय केला असून न्यायासाठी आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी या आधीच स्पष्ट केले होते.त्यानंतर आता ठाकरे गटाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालय आता याबाबत काय निर्णय देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं आहे.
निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय चुकीचा असून त्यांनी अनेक मुद्द्याकडे दुर्लक्ष केले आहे. असे ठाकरे गटाच्या वतीने याचिकेत म्हंटले आहे. तर आजच्या यादीत तुमची याचिका नाही त्यामुळॆ उद्या लिस्टेड मेन्शन कडून या असे आदेश ठाकरे गटाला न्यायालयाच्यावतीने करण्यात आले आहेत.
ठाकरे गटाने काय म्हटलंय नेमकं याचिकेत
पक्षाचे बहुतांश सदस्य आमच्या बाजूने असा याचिकेत उल्लेख
निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय लोकशाही मार्गाने नाही
कोर्टाचा निकाल येईपर्यंत आयोगाच्या निकालाला स्थगिती द्या
२०१८ ची कार्यकारणी पक्षाच्या घटनेप्रमाणे योग्य,याचिकेत उल्लेख
कार्यकारणीनुसार पक्षाध्यक्षाला सर्वोच्च अधिकार




