नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सलग तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आज सुनावणीचा सलग तिसरं दिवस होता. आज ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवादाला सुरुवात केली. काल शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या एका एका दाव्यांवर सिब्बल यांनी युक्तिवाद केला. दोन्हही बाजू ऐकून घेतल्यानंतर याबाबतचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. आजच्या सुनावणी दरम्यान, गोवा, मध्यप्रदेश, कर्नाटकाचा दाखला दिला गेला. तसेच नबाम रेबिया प्रकरण असे अनेक दाखलेही देण्यात आले. दोन्हही बाजूच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेताना न्यायालयाने काही सवाल करत महत्वाचे निरीक्षण देखील नोंदवले. ठाकरे गटाने केलेल्या सात जजेसच्या खंडपीठाच्या मागणीवर देखील सस्पेन्स कायम आहे. नबाम रेबिया प्रकरण महाराष्ट्रात लागू होत नाही कालपासून या सुनावणीमध्ये नबाम रेबिया प्रकरणाचा उल्लेख होताना दिसून आले आज या प्रकरणावर सरन्यायाधीशांनी भाष्य केल्याचे पाहायला मिळाले. नबाम रेबिया प्रकरण महाराष्ट्रात लागू होत नाही, अशी महत्वाची टिपण्णी सरन्यायाधिशांनी सुनावणी दरम्यान केली. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी मुख्यमंत्र्यांनी बहुमत चाचणीपूर्वी राजीनामा दिला होता ही बाब कालच न्यायालयासमोर मांडली होती. त्यामुळं अविश्वास प्रस्तावाची वेळ आली नाही यासंदर्भात देण्यात आलेली नोटीसच आपोआप रद्द झाली आहे. त्यामुळं त्याच्या अचूकतेबाबत आता पडता येणार नाही. जर मुख्यमंत्र्यांनी (उद्धव ठाकरे) राजीनामा दिला नसता आणि पक्षाच्या विरोधात मतदान झालं असतं तर त्यावर व्हिपचं उल्लंघन झालं असतं असं म्हणता आलं असतं, असा न्यायालयाचा सूर आहे.त्यामुळं नबाम रेबियाचा जसाच्या तसा संदर्भ महाराष्ट्राच्या बाबतीत काढता येणार नाही, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.