नवी दिल्ली – पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके जाहीर केली जातात. यंदा देशभरातील एकूण 1090 पोलिसांना ‘पोलीस पदके’ जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ७ पोलिसांचा शौर्य पदकाने सन्मान करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिन – 2025 निमित्त पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक व नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांच्या एकूण 1090 जणांना शौर्य/सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातल्या 7 पोलिसांना शौर्य पदक, 3 पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 39 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक, अग्निशमन दलातील 3 जण शौर्य पदकाचे तर 5 जण गुणवत्तापूर्ण सेवेसाठीच्या पदकाचे मानकरी; गृहरक्षक व नागरी संरक्षण सेवेच्या 5 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक; सुधारात्मक सेवेचे 8 जण गुणवत्तापूर्ण सेवेसाठीच्या पदकाचे मानकरी ठरले आहेत.