मुंबई – आलिया भट आणि रणबीर कपूरचा ब्रम्हास्त्र बहुचर्चित सिनेमा ब्रम्हास्त्र लवकरच प्रदर्शित होणार आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतर बॉलीवूडला अजूनही एका मोठ्या हिटची प्रतीक्षा आहे. थिएटर्स सुरु झाल्यानंतर अनेक चित्रपट आलॆ मात्र साऊथ सिनेमांमुळे प्रेक्षकांनी हिंदी चित्रपटाकडे पाठ फिरवली आता अशात नेटकऱ्यांनी ब्रम्हास्त्र चित्रपटाची स्टोरी सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली आहे.
आलिया आणि रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ 9 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात ही खऱ्या आयुष्यातली जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, नागार्जुन, दीपिका पदुकोणयांना देखील लोक ब्रम्हास्त्रमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अनेक दिग्गज या चित्रपटात असल्यामुळे अयान मुखर्जीच्या चित्रपटाबद्दल अपेक्षा जास्त आहेत. दरम्यान, ‘ब्रह्मास्त्र’ची कथा लीक झाल्याने चित्रपटातील खरा खलनायक कोण हे लोकांना कळले आहे.
‘ब्रह्मास्त्र’ हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. जेव्हापासून त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे, तेव्हापासून लोकांमध्ये त्याची प्रचंड उत्सुकता आहे. ट्रेलर रिलीज होताच रणबीर कपूर या चित्रपटात शिवाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले आहे. पण ‘ब्रह्मास्त्र’ची कथा सोशल मीडियावर लीक झाली असून चित्रपटाचा खरा खलनायक कोण आहे हे लोकांना कळले आहे.
मौनी रॉय चित्रपटातील खलनायक नाही, तर चित्रपटात खलनायक असेल तर ती ईशा म्हणजेच आलिया भट्ट आहे. असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.यासोबतच शोष मीडियावर लोक म्हणतात की आलिया हा रणबीर कपूरसाठी एक हनीट्रोप आहे, जी शिवाच्या मदतीने इतर सर्व शस्त्रांपर्यंत पोहोचेल. या कथेबद्दल असाही अंदाज वर्तवला जात आहे की, आलिया ही देखील एक शस्त्र आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत प्रचंड कुतूहल आहे म्हणूनच अनेकांनी तर्क वितर्क लावायला सुरुवात केल्याचे दिसून येते.