BPL 2022 : क्रिकेटपटूचे मैदानावरच धुम्रपान
Updated On:

ढाका – अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू सध्या बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या बांगलादेश प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत खेळत असून त्याच्या एका गैरवर्तनाने सध्या तो टीकेचा धनी बनला आहे. या स्पर्धेतील का सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला होता.
यावेळी अफगाणिस्तानचा अहमद शेहजाद अन्य खेळाडूंसह रेनब्रेकमध्ये मैदानात पाहणी करण्यासाठी आला होता. यावेळी त्याने चक्क धुम्रपान केले. या घटनेमुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून आयसीसीच्या नियमांनुसार त्याला एक डीमेरीट गुणही देण्यात आले आहेत.






