Satara | रामोशी समाजातील मुला, मुलींनी शिक्षणात प्रगती करावी

वरकुटे मलवडी, (प्रतिनिधी) – रामोशी समाज शिक्षणात मागे रहात असल्याने या समाजाची प्रगती खुंटली आहे. हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच काही बांधव शिकले आणि पुढे गेले आहेत. मात्र, आजही गावगाड्यात रामोशी समाज मोलमजुरी करुन जगत आहे. यासाठी रामोशी समाजातील मुला, मुलींनी शिक्षणात प्रगती करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य एम. एम. ग्रुपचे अध्यक्ष एम. एम. मदने यांनी केले.
दै. प्रभातशी या अनुषंगाने बोलताना ते म्हणाले, माण तालुका रामोशी समाज हा रामाच्या काळापासून चालत आलेला समाज आहे. या समाजातील लोक गरीब, कर्तबगार, कष्टाळू व इमानदार अशी ओळख असलेला समाज म्हणजे रामोशी समाज आहे.
या समाजातील शिवाजी महाराजांच्या दरबारात असलेले हेरगिरी (गुप्तहेर) खाते असलेले बहिर्जी नाईक यांनी प्रत्येक किल्ल्यावर वेगवेगळ्या वेशभूषात जावुन तेथील प्रत्येक माहिती महाराजांनपर्यंत पोहचवण्याचे काम या सामाजातील शुरविर लोकांनी केले होते.
आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांनी इंग्रज सरकारला धडकी भरवण्याचे काम या क्रांतिकारकांनी केले ते रामोशी समाजाचे होते या दोन क्रांतिकारकांनी समाजासाठी नव्हे तर देशासाठी आपले बलिदान दिले.
नंतरच्या काळात राजकीय लोकांनी या समाजातील लोकांचा फक्त मतांसाठी वापर करून घेतला गेला. समाजातील लोक याला बळी पडताना दिसत आहेत. समाजातील लोकांनी एकसंघ असणे गरजेचे आहे तर संघर्ष करण्यास बळ मिळते व त्यामुळे न्याय मिळतो.
समाजात असणार्या अडीअडचणीला सामोरे कसे गेले पाहिजे हे आपणाला पहायला मिळेत असते. समाजातील मुला-मुलींनी भरपूर शिकलं पाहिजे. उच्चशिक्षित झाले पाहिजे तरच रामोशी समाजाची प्रगती होईल.
रामोशी समाजातील लोक बोटावर मोजण्याइतपत मोठ्या हुद्यावर काम करत आहेत. परंतु, अशाही लोकांनी जरा आपला थोडावेळ काढून समाजात लक्ष घातले की समाज सुधारायला वेळ लागणार नाही. एका दोघांनी लक्ष घालून समाजाची प्रगती होणार नाही. सर्व रामोशी समाजाने आपल्या सर्वांगीण विकासासाठी एकजूट बांधण्याची गरज एम. एम. मदने यांनी व्यक्त केली.





