पिंपरी | आईला मारहाण करणाऱ्या मुलाला अटक
Updated On:

सोमाटणे (वार्ताहर) – आईला च लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या मुलाला तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.28) सोमाटणे फाटा, मावळ येथे घडली आहे.
याप्रकरणी महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.. यावरून स्वप्नील अरुण लांडे (वय 35 रा.सोमाटणे फाटा) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्याच आईला हाताने मारहाण करत डोके भिंतीवर आपाटले व पोटात लाथ मारून गंभीर जखमी केले. यावरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.





