Box Office: बॉक्स ऑफिसवर लोका’ची दमदार कामगिरी: ‘मद्रासी’ आणि ‘बागी 4’ला झटका, शाहरुख-सलमानलाही मागे टाकलं कल्याणी प्रियदर्शने

Box Office: या वर्षी मोठ्या बजेटच्या चित्रपटांपेक्षा लहान बजेटच्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बॉलीवूड असो की साऊथ, कथा आणि सादरीकरणाच्या जोरावर कमी बजेटचे चित्रपट जोरदार गाजत आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शनच्या लोका (Lokah) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.
12 दिवसांत विक्रमी कमाई
लोका चित्रपटाने केवळ 12 दिवसांत भारतात तब्बल 88.25 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरातून हा आकडा 187 कोटींपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा बजेट फक्त 30 कोटी आहे. दुसऱ्या सोमवारीदेखील या चित्रपटाने 5.75 कोटींचा गल्ला जमवला. लवकरच हा चित्रपट 200 कोटींचा टप्पा गाठणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ओव्हरसीज मार्केटमध्येही लोकाने 91 कोटींचा व्यवसाय केला आहे.
‘बागी 4’ आणि ‘मद्रासी’ला मोठा फटका
कल्याणीच्या लोकासमोर टायगर श्रॉफ आणि संजय दत्तच्या बागी 4 ला मोठा फटका बसला आहे. अॅक्शनने भरलेल्या या चित्रपटाने पहिल्या सोमवारी फक्त 4.25 कोटींची कमाई केली. आतापर्यंत भारतातून या चित्रपटाने केवळ 35 कोटीच कमावले आहेत. तर दुसरीकडे मद्रासी या चित्रपटाची खूप चर्चा होत असली तरी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची पकड कमकुवत ठरली आहे. सोमवारी या चित्रपटाने फक्त 4.15 कोटींची कमाई केली असून एकूण 40.55 कोटींचा व्यवसाय झाला आहे.
शाहरुख-सलमानलाही मागे टाकलं
कल्याणी प्रियदर्शनच्या लोकाने केवळ टायगर श्रॉफलाच नव्हे तर बॉलीवूडच्या दोन मोठ्या खानना ,शाहरुख आणि सलमानलाही मागे टाकले आहे. 12 दिवसांनंतर ज्यांच्या चित्रपटांनी 5 कोटींचा टप्पा गाठला होता, त्यात सलमानचा टायगर 3 आणि शाहरुखचा रईस यांचा समावेश आहे. पण लोकाने या आकड्यालाही मागे टाकत बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे.
एकंदरीत, कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने मोठ्या स्टार्सना कडवी टक्कर दिली आहे. लोकाचा तुफान अजून काही दिवस थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.





