#IPL2022 | चहल ‘आरसीबी’वर नाराज
Updated On:

बेंगळुरू – आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर बेंगळुरूकडून (आरसीबी) गेली अनेक वर्षे सरस कामगिरी केल्यानंतरही लेग स्पीन गोलंदाज यजुवेंद्र चहल याला मुक्त करण्यात आले. यामुळे चहलने नाराजी व्यक्तकरतानाच धन्यवाद आरसीबी अशा शब्दांत संघ मालकांना टोला लगावला आहे.
या स्पर्धेत आरसीबीला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. मात्र, त्यातही चहलने अनेक सामने संघाला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जिंकून दिले. संघाकडून खेळताना अनेक चढ-उतार पाहिले, यशापयशही अनुभवले.
मात्र, संघाशी जोडले गेलेले संबंध असे तुटतील असे वाटले नव्हते. असो, संघाला पुढील मोसमातील सरस कामगिरीसाठी माझ्या शुभेच्छा, अशा भावनाही चहलने व्यक्त केल्या.





