दुबई – भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हाच सध्याचा जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज आहे, अशा शब्दात इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने कौतुक केले आहे.
बुमराह या क्षणी जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. शेवटच्या तीन सामन्यांत त्याने 10 विकेट घेत 45 धावा दिल्या. टी-20 क्रिकेटमध्ये हे दिसत नाही.
त्याची सर्वात महत्त्वाची बाब हीच की, तो रनअप सुरू केल्यावर मध्येच थांबतो आणि शेवटच्या क्षणी बॉल फेकतो. त्याने स्टोनिसला बाद केलेला चेंडू खूप वेगवान होता आणि काही समजण्याआधीच त्याचा त्रिफळा उडाला. त्याच्या गोलंदाजीत हे अचानक होणारे बदल फलंदाजाला कळतच नाहीत हेच त्याचे यश आहे, असेही वॉन म्हणाला.