जळोची- बारामतीत काल घेण्यात आलेल्या ६९ चाचण्यांपैकी ५२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून १५ जणांचे अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
काल एकूण ६९ स्वँब नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी ५२ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला असून १५ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. व बारामती शहरांमधील दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामध्ये ७८ वर्षाची स्टेशन रोड बारामती येथील महिला व ५२ वर्षाची देशपांडे स्टेट संघवी पार्क शेजारी हरिकृपा नगरीतील महिला यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.