Bihar Elections 2025 | बिहार विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. सर्व जागांवर प्राथमिक कल आले आहेत. ज्यात आता मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीए १७० पेक्षा जास्त तर महाआघाडी ६० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव राघोपुर मतदारसंघात सुरुवातीला आघाडी घेतल्यानंतर आता मागे पडले आहेत. सध्या भाजपचे सतीश कुमार 3,016 मतांनी आघाडीवर आहेत. तेजस्वी यादव राघोपुरमधून मागे पडले आहेत. मतमोजणी सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच तेजस्वी मागे आहेत. तेज प्रताप यादव महुआ जागेवर चौथ्या क्रमांकावर दुसरीकडे, आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे मोठे चिरंजीव तेज प्रताप हे महुआ मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. राजदमधून वेगळे होऊन स्वतःची पक्ष काढणारे तेज प्रताप यादव महुआ जागेवर चौथ्या क्रमांकावर आहेत. या जागेवर लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे उमेदवार संजय कुमार सिंह साडेतीन हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. आरजेडीमधून बाहेर काढल्यानंतर तेज प्रताप यादव यांनी आपली नवीन पक्षाची स्थापना केली आहे. त्यांच्या पक्षाचे नाव ‘जनशक्ति जनता दल’ आहे. आरजेडीचे उमेदवार मुकेश रोशन हे त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी मानले जात आहेत, जे मागच्या वेळी या जागेवरून विजयी झाले होते. दरम्यान, राज्यातील २४३ जागांसाठी ६ आणि ११ नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान झाले होते. हेही वाचा : शिंदे सेनेतील नेत्याचे जावई शिवदीप लांडे पिछाडीवर; धडाकेबाज कामगिरीमुळे मिळाली ‘सिंघम’ म्हणून लोकप्रियता