पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात आज दोन रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. तर आणखी 33 जणांना करोनाची लागण झाली. त्यामुळे शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 1181 झाली आहे. नाणेकरचाळ पिंपरी येथील 40 वर्षीय महिलेचा व अजंठानगर आकुर्डी येथील 47 वर्षीय पुरुषाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
शहरात आज 33 रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये 18 पुरुष व 15 महिलांचा समावेश आहे. आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण बौद्धनगर, चिंचवड, गणेशनगर थेरगाव, पिंपरी, साईबाबानगर चिंचवड, गवळीनगर भोसरी, भाटनगर, अजंठानगर, आनंदनगर चिंचवड, सिद्धार्थनगर दापोडी, पाटीलनगर चिखली, तानाजीनगर येथील रहिवासी आहेत.
शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 1181 झाली आहे. तर आजपर्यंत रुग्णालयातून 673 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरात सद्यस्थितीत 498 सक्रीय रुग्ण आहेत. दरम्यान, आज दिवसभरात 56 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 673 झाली आहे. आज नाणेकर चाळ पिंपरी, आनंदनगर, जयमाला सांगवी, दापोडी, पाटीलनगर चिखली, केशवनगर चिंचवड येथील रहिवासी असलेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले.