Eknath Shinde on Uddhav Thackeray| लोकसभा निवडणुकींच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आमच्या पक्षात कोणीही बॉस किंवा नोकर नाही. आम्ही सर्व एकमेकांच्या सहकार्याने काम करत आहोत,” असे एकनाथ शिंदे नागपुरातील एका प्रचार सभेत बोलत होते.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे ? Eknath Shinde on Uddhav Thackeray|
“आमच्या पक्षात उद्धव ठाकरे यांच्या पक्षासारखी बॉस आणि नोकर अशी संकल्पना नाही. आम्ही सर्व जण आमच्या पक्षात समान आहोत माझ्यासह आमच्या पक्षाचे सर्व मंत्री कार्यकर्ते असल्यासारखी भूमिका पार पाडत आहेत. मी मुख्यमंत्री आहे, पण मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो. आम्ही सर्व एकमेकांच्या सहकार्याने काम करत आहोत,” असे म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी आम्हाला घरचे नोकर बनवले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घराणेशाहीच्या राजकारणावरून त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले, आमच्या पक्षात राजाचा मुलगा राजा होणार नाही, जो काम करतो तोच राजा होईल. बाळासाहेब ठाकरे आपल्या सहकाऱ्यांना मित्र मानत, पण उद्धव ठाकरे यांनी आम्हाला घरचे नोकर बनवले. पक्ष किंवा राज्य कधीही घरात बसून चालवता येत नाही, असेही शिंदे म्हणाले.
“महायुती आघाडी विदर्भातील सर्व जागा जिंकणार” Eknath Shinde on Uddhav Thackeray|
तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला, विरोधी पक्ष तीन तिगडा काम बिगडा आहे, असे म्हणत त्यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची महायुती आघाडी विदर्भातील सर्व जागा जिंकणार आहे असा दावा केला. महायुतीला विदर्भात चांगला प्रतिसाद मिळत आहे. विदर्भातील लोकसभेच्या सर्व जागा महायुती जिंकेल, असे वातावरण आहे. दोन ते तीन दिवसांत महायुती उर्वरित जागांवर निर्णय घेईल, असेही मुख्यमंत्री शिंदे स्पष्ट केले.
हेही वाचा: