राजगुरूनगर : खेड तालुक्यातील वाफगाव येथील अमर मच्छिंद्र बोर्हाडे यांना चेंज इंडिया फाउंडेशन पुणे या संस्थेच्या वतीने ‘लढवय्या उमेदवार’ पुरस्कार देवून पुणे येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अमर बोर्हाडे यांनी शिरूर लोकसभा आणि आता खेड-आळंदी विधानसभा निवडणूक लढवली होती. चेंज इंडिया फाऊंडेशन पुणे या संस्थेच्या वतीने विधानसभा निवडणुका लढविणार्या व्यक्तींना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. यावेळी वाफगाव येथील अमर बोर्हाडे यांना लढवय्या उमेदवार इंडिया फाऊंडेशन पुणे अध्यक्ष सचिन धनकुडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.