Border-Gavaskar Trophy 2024/25 (Nathan Lyon on Rishabh Pant) : – ऋषभ पंत सारख्या आक्रमक फलंदाजाला गोलंदाजी करताना खूप काळजी घ्यावी लागते. मैदानावर सगळीकडे फटकेबाजी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. माझ्या चेंडूवर षटकार मारला, तर गोलंदाज म्हणून ते आव्हान असते. मला षटकारांची भाती वाटत नाही, पंत सारख्या खेळाडूला बचावात्मक खेळायला लावणे, हीच सर्वोत्तम रणनीती असल्याचे ऑस्टेलियाचा अनुभवी गोलंदाज नॅथन लायन याने म्हटले आहे. पाच कसोटी लढतींच्या मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी पर्थ येथे खेळविण्यात येणार आहे. त्यानंतर अनुक्रमे अडलेड,ब्रिस्बेन, मेलबर्न व सिडनी येथे लढती असणार आहेत. ऑस्ट्रेलिया संघाने २०१४-१५ पासून बॉर्डर-गावस्कर चषकावर आपले नाव कोरले नाही. मात्र भारतीय संघाने २०१८-१९ व २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियाला संघाला त्यांच्याच देशात जाऊन पराभूत करण्याची किमया केली आहे. विश्व कसोटी क्रमवारीत भारत सध्या पहिल्या तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज असलेल्या नेथन लायनने भारताचा यष्टिरक्षक ऋषभ पंतचे कौतूक केले आहे. गेल्या दोन कसोटी मालिकांमध्ये ऋषभ पंतने दमदार कामगिरी केली होती. त्याने १ शतक आणि २ अर्धशतके झळकावताना ६२४ धावा चोपल्या होत्या. अपघातानंतर ऋषभ पंतने नुकतेच बांगलादेश विरुद्धच्या लढतीमध्ये पुनरागमन केले असून दुसऱ्या डावात त्याने दमदार शतकी खेळी केली आहे. Vinesh Phogat : नाडाने विनेश फोगटला बजावली नोटीस, 14 दिवसांत मागितले उत्तर, जाणून घ्या…काय आहे प्रकरण चुकीला माफी नाही… पाच कसोटीच्या लढतीमध्ये ऋषभ पंत महत्वाची भूमिका बजावणार आहे. पंतकडे असलेल्या क्षमतेमुळे तो भन्नाट फटकेबाजी करू शकतो. त्याला गोलंदाजी करताना गोलंदाज म्हणून तुम्ही चूक केली की, त्यावर त्याचे उत्तर ठरलेले असते. त्यामुळे तुम्हाला चुका टाळण्याशिवाय पर्याय नाही. त्याच्याकडे तुम्ही केलेल्या चुकांना माफी नसते, असे लायनने बोलताना सांगितले.