पुणे -बोपोडी येथील एका खासगी रुग्णालयात करोना संशयित रुग्णाने हॉस्पिटलवरून उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मात्र, आत्महत्येचे कारण समजले नाही.
काही दिवसांपूर्वीच करोनाच्या संशयावरून आई आणि मुलगा उपचाराचासाठी या रुग्णालयात दाखल झाले होते.
दरम्यान, गुरुवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे रुग्णालयाचा वीजपुरवठा काहीकाळ खंडित झाला होता. त्याच वेळेस सदर करोना संशयित रुग्णाने हॉस्पिटलवरुन उडी मारून आत्महत्या केली.
घटनेची माहिती समजताच पोलीस कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवत मिसाळ यांनी दिली. करोना बोपोडीत करोना
संशयित रुग्णाची आत्महत्यासंशयित रुग्णाने रुग्णालयात आत्महत्या करण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.