बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटनी हे इंडस्ट्रीतील फेवरेट कपल पैकी एक आहे. हे कपल अनेक वेळा एकत्रित स्पॉट करण्यात आले आहे. सध्या दिशा आणि टायगर हे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मालदीवला गेले आहे. या दोघांनी सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
मात्र, या फोटोंमध्ये दोघे कुठेही एकत्रित दिसत नाही. परंतु दोघांच्याही सोशल मीडिया अपडेटस्वरून ते एकाच ठिकाणी असल्याचे दिसून येते. टायगरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, खराब केस… माझ्यासारख्या लोकांना जास्त काळजीही नसते.” या व्हिडिओत पक्ष्यांचा आवाज आणि त्यांचा किलबिलाट स्पष्टपणे ऐकू येतो.
View this post on Instagram
यासह त्याने एक फोटोही शेअर केला आहे. ज्यात शर्टलेस असलेल्या टायगरच्या मसल्स दिसत आहे. यासोबत दिशा पाटनीनेही एक सुंदर असा फोटो शेअर केला आहे. ज्यात ती येलो बिकिनीमध्ये एक्वामॅन पोजमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास टागर श्रॉफ लवकरच “हीरोपंती-2′ आणि “गणपत’ चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. दुसरीकडे दिशा पाटनी सलमान खानसोबत “राधे’ आणि “मलंग-2’मध्ये झळकणार आहे.
View this post on Instagram