Dharmendra passes away : सध्या बॅालिवूड इंडस्ट्रीला मोठे ग्रहन लागले असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांच्या निधनाच्या बातमीने बॅालिवूड इंडस्ट्रीवर दुःखाचा डोंगर कोसळत आहे. अशातच आणखी दुःखद बातमी समोर येत आहे. 89 च्या दशकात आपल्या दमदार अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण करणारे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने बॅालिवूड इंडस्ट्रीसह सिनेइंडस्ट्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी वयाच्या 89 वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. धर्मेंद्र यांनी ७० च्या दशकात मोठ्या पडद्यावर आपल्या साध्या सरळ अभिनयाने सर्वांची मनं जिंकली. त्यांनी फिल्मी कारकीर्दीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अनेक हिट सिनेमे त्यांनी सिनेमा इंडस्ट्रीला दिले आहेत. बॅालिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत शोले चित्रपटातील विरूच्या पात्राने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली आहे.