Priyadarshan : ऐन दिवाळीत बॅालिवूडकरांना ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांच्या निधनाने मोठा धक्का बसला. सगळीकडे दिवाळी साजरी होत असताना बॅालिवूडवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला. असरानी यांच्या अकाली जाण्याने बॅालिवूडने एका मोठ्या कलाकाराला गमावले आहे. आता बॅालिवूडमधून अशी एक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे सगळ्यांनाच शॅाक बसला आहे. आपल्या सिनेमांतून बॅालिवूडचा खिलाडी अक्षय कुमार कधी गंभीर तर कॅामेडी भूमिका करून प्रेक्षकांना खळखळून हसवतो. तोच अक्षय कुमार डिप्रेशनमध्ये असल्याचा खुलासा बॅालिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी केला आहे. त्यांनी अक्षयच्या डिप्रेशनचे कारणही सांगितले आहे. एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. प्रियदर्शन यांनी अक्षय कुमार नैराश्यात असल्याचे सांगितल्याने अक्षयच्या फॅन्सला मोठा धक्का बसला आहे. सध्या अक्षय आणि प्रियदर्शन एकत्र आगामी तीन सिनेमांचे शुटिंग करत आहे. यावेळी तो डिप्रेशनचा सामना करत असल्याचे प्रियदर्शन यांनी सांगितले आहे. ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांच्या निधनाने अक्षय कुमारलाही धक्का बसला आहे. अक्षय कुमार नैराश्यात असल्यासारखा वागतोय, असा खुलासा दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी केला आहे. अक्षयला हे सत्य स्वीकारता येत नाही की, असरानी आता या जगात नाहीत, असेही प्रियदर्शन यांनी सांगितले आहे. नेमकं काय म्हणाले प्रियदर्शन? “अक्षय कुमारने मला दोनदा फोन केला. त्याने सांगितले की, तो गेल्या 40-45 दिवसांपासून असरानी सरांसोबत दोन सिनेमांवर काम करतोय आणि त्यांच्या अशा अचानक जाण्याने नैराश्य आले असल्याचे सांगितले. यावर प्रियदर्शन यांनी त्याला सल्ला दिला असल्याचे त्यांनी सांगितले. त्रास होत असतानाही शुटिंग केले पूर्ण दिवंगत अभिनेते असरानी हे ‘भूत बांगला’ आण ‘हैवान’ या दोन सिनेमात दिसणार आहेत. सेटवर त्यांना पाठदुखीचा त्रास होता, म्हणून आम्ही त्यांना खुर्ची द्यायचो. कॅमेरा सुरू झाल्यानंतरच आम्ही त्यांना उठायला सांगायचो. या सगळ्यातही त्यांनी सिनेमाचे शुटिंग पूर्ण केले असल्याचे प्रियदर्शन यांनी सांगितले. या दोनही सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असणार आहे. हेही वाचा : महायुती मुंबईत एकत्र लढणार? जागावाटपावरील अंतर्गत वादाबाबत एकनाथ शिंदे स्पष्टच म्हणाले…