Vivek Oberoi: सलमानच्या समर्थनार्थ विवेक ओबेरॉयची मोठी भूमिका; ट्रोलिंगवर म्हणाला…
Vivek Oberoi विवेक ओबेरॉयने एका मुलाखतीत बोलताना ऑनलाइन ट्रोलिंगबाबत आपले मत व्यक्त केले. सोशल मीडियावर वाढणाऱ्या नकारात्मकतेपेक्षा सकारात्मक गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्याने म्हटले.

Vivek Oberoi: बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस 20’च्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमानने सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर नाराजी व्यक्त केली होती. विशेषतः एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावरून किंवा शरीरावरून ट्रोल करणे चुकीचे असल्याचे त्याने म्हटले होते. आता अभिनेता विवेक ओबेरॉयनेही अप्रत्यक्षपणे सलमानच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
विवेक ओबेरॉयने एका मुलाखतीत बोलताना ऑनलाइन ट्रोलिंगबाबत आपले मत व्यक्त केले. सोशल मीडियावर वाढणाऱ्या नकारात्मकतेपेक्षा सकारात्मक गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्याने म्हटले.
विवेक म्हणाला की, आयुष्यात सकारात्मक करण्यासाठी आणि बोलण्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी आहेत. मग आपण नकारात्मकतेकडे का लक्ष द्यायचे? नकारात्मक गोष्टींवर चर्चा करण्याची गरजच काय, असा सवालही त्याने केला.
विवेकचे हे वक्तव्य सलमान खानच्या ट्रोलिंगवरील भूमिकेशी जोडले जात आहे. त्यामुळे दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांमध्येही याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सलमान आणि विवेक यांच्यातील संबंध गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय राहिले आहेत. त्यामुळे विवेकने सलमानच्या भूमिकेला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिल्याने या वक्तव्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
सलमानने कतरिना कैफसाठी घेतली भूमिका
‘बिग बॉस 20’मध्ये सलमान खानने अभिनेत्री कतरिना कैफच्या बॉडी शेमिंगच्या मुद्द्यावरही भाष्य केले होते. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कतरिना आपल्या पतीसोबत एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यावेळी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. काही सोशल मीडिया युजर्सनी तिच्या शरीरावरून कमेंट्स केल्या.
यावर सलमानने प्रश्न उपस्थित केला की, प्रेग्नन्सीनंतर एखाद्या महिलेचे वजन वाढले तर तिला ट्रोल का केले जाते? प्रेग्नन्सीदरम्यान वजन वाढणे ही सामान्य गोष्ट असल्याचेही त्याने सांगितले. सलमानने बॉडी शेमिंग आणि एज शेमिंगवरही नाराजी व्यक्त केली. एखाद्याच्या शरीरावरून किंवा वयावरून त्याची खिल्ली उडवणे योग्य नसल्याचे त्याने स्पष्ट केले. कतरिनाच्या समर्थनार्थ याआधी अभिनेत्री परिणीती चोप्रानेही सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली होती. तिने कतरिनाला सुंदर म्हटले होते.

Vivek Oberoi
अनेक कलाकारांनी दिला सलमानला पाठिंबा
सलमान खानच्या या भूमिकेनंतर मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी त्याला पाठिंबा दिला. दिग्दर्शक रोहित शेट्टी, स्मृती इराणी, कुशाल टंडन, वरुण धवन, नेहा धूपिया, धीरज धूपर, कश्मीरा शाह, कुणाल कोहली आणि मोनालिसा यांनीही या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली.
आता विवेक ओबेरॉयच्या वक्तव्यामुळे या यादीत त्याचेही नाव चर्चेत आले आहे. मात्र विवेकने आपल्या वक्तव्यात सलमानचे नाव थेट घेतलेले नाही. त्याने फक्त ऑनलाइन ट्रोलिंग आणि नकारात्मकतेपेक्षा सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे.
सलमान आणि विवेकच्या आगामी प्रोजेक्टची चर्चा
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सलमान खान आगामी ‘मातृभूमि’ या चित्रपटात दिसणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे विवेक ओबेरॉयच्या आगामी प्रोजेक्टमध्ये ‘रामायण’चा समावेश आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर आणि सई पल्लवी मुख्य भूमिकेत आहेत. यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. वृत्तांनुसार, विवेक ओबेरॉय या चित्रपटात विद्युतजिव्हाची भूमिका साकारणार आहे.





