Vijay Thalapathy: विजय थलपतींच्या घरी जल्लोषाची सुरुवात; टीव्हीके आघाडीवर, कुटुंबात आनंदाचं वातावरण
Vijay Thalapathy विजय यांच्या विजयासाठी त्यांच्या कुटुंबीयांनीही प्रार्थना केल्याचं समोर आलं आहे. त्यांचे वडील एस ए चंद्रशेखर सकाळी लवकर मुरुगन मंदिरात गेले होते. त्यांनी आपल्या मुलाच्या यशासाठी देवाकडे प्रार्थना केली. विजय यांच्या कारकिर्दीत त्यांच्या वडिलांनी नेहमीच पाठिंबा दिला असून त्यांच्या राजकीय प्रवासातही ते सक्रियपणे साथ देताना दिसतात.

Vijay Thalapathy: तमिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ च्या मतमोजणीदरम्यान साऊथ सुपरस्टार विजय थलापती यांच्या घरी आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. सिनेमा क्षेत्रातून राजकारणात उतरलेल्या विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळगम’ (टीव्हीके) पक्षाने सुरुवातीच्या निकालांमध्ये आघाडी घेतली असून त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
मतमोजणी सुरू असताना टीव्हीके पक्ष सुमारे १०० हून अधिक जागांवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे सत्ताधारी डीएमके पक्ष यापेक्षा खूप मागे असल्याचं चित्र आहे. त्यामुळे तमिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Vijay Thalapathy
#WATCH | Tamil Nadu Assembly Elections | Visuals from outside the residence of TVK chief Vijay in Chennai.
Counting of votes for all 234 Assembly constituencies of the state will begin at 8 AM today. pic.twitter.com/9uAs0hCKdf
— ANI (@ANI) May 4, 2026
या पार्श्वभूमीवर विजय थलापती (Vijay Thalapathy) यांच्या घराबाहेर मोठी हालचाल सुरू झाली आहे. अनेक गाड्या घरासमोर येताना दिसत आहेत, तर काहीजण फुलांचे गुच्छ घेऊन अभिनेत्याच्या घरी जात आहेत. मात्र, विजय यांनी अद्याप निकालाबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. (Vijay Thalapathy)
विजय यांच्या विजयासाठी त्यांच्या कुटुंबीयांनीही प्रार्थना केल्याचं समोर आलं आहे. त्यांचे वडील एस ए चंद्रशेखर सकाळी लवकर मुरुगन मंदिरात गेले होते. त्यांनी आपल्या मुलाच्या यशासाठी देवाकडे प्रार्थना केली. विजय यांच्या कारकिर्दीत त्यांच्या वडिलांनी नेहमीच पाठिंबा दिला असून त्यांच्या राजकीय प्रवासातही ते सक्रियपणे साथ देताना दिसतात.
Thalapathy #Vijay Father #SAChandrasekhar offered prayers at Thiruthani Murugan Temple 🙏#TVK #TVKVijay pic.twitter.com/6nwIuqNoOd
— Milagro Movies (@MilagroMovies) May 4, 2026
दरम्यान, विजय थलापती यांच्या राजकीय एंट्रीने तमिळनाडूच्या राजकारणात नवा रंग भरला आहे. अभिनेता म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवल्यानंतर त्यांनी थेट निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. (Vijay Thalapathy)
विजय यांच्या चित्रपटांप्रमाणेच त्यांच्या शेवटच्या ‘जन नायकन’ या चित्रपटाचीही चर्चा सुरू आहे. हा चित्रपट जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार होता, मात्र सेन्सॉरशी संबंधित वादांमुळे तो अजूनही प्रदर्शित झालेला नाही. अलीकडेच या चित्रपटाच्या ऑनलाइन लीक होण्याची बातमीही समोर आली होती. काही अहवालांनुसार, निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर हा चित्रपट ८ मे रोजी प्रदर्शित होऊ शकतो.
In Thalapathy’s House 🤩🤩🤩pic.twitter.com/PEmsUF0QGQ
— KERALA VIJAY FANS CLUB (@KVFC_Official) May 4, 2026
एकूणच, विजय थलपती (Vijay Thalapathy) यांच्या राजकीय प्रवासाचा हा महत्त्वाचा टप्पा असून त्यांच्या पक्षाने घेतलेली आघाडी पाहता पुढे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या घरी सुरू झालेला जल्लोष आणि समर्थकांचा उत्साह हे त्यांच्याबद्दलची लोकप्रियता आणि अपेक्षा दर्शवतात.





